Loading Events
  • This event has passed.

Dindi Celebration was held on 28th June, 2023 in the most traditional manner

June 28, 2023

कार्यक्रमाची रूपरेषा
१. विठ्ठल रुक्मिणी पूजन आरती व पालखी प्रस्थान.
२. श्लोक अभंग स्पर्धेतील विजेते विद्यार्थी अभंग सादरीकरण
3. नाटिका- १. वारीचे महत्त्व
२. ताटी उघडा ज्ञानेश्वरा
३. संत जनाबाई
४. भक्ती शक्तीची भेट
४. बक्षीस वितरण व पसायदान कार्यक्रम सांगता
५. प्रसाद चिक्की वाटप

दि. २८ जून २०२३ रोजी ज्ञानसंपदा शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने झालेला दिंडी उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदमय वातावरणात संपन्न झाला .आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेमध्ये इयत्ता नर्सरी ते आठवीच्या वर्गातील मुलांची श्लोक व अभंग स्पर्धा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांचा वर्गनिहाय सहभाग अनिवार्य करण्यात आला. दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट श्लोक अभंगाचे सादरीकरण केले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या नाटिका सादर करून सामाजिक संदेश दिला. यामध्ये ‘वारीचे महत्त्व’, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’, ‘संत जनाबाई’, ‘भक्ती शक्तीची भेट’, या नाटकांचा समावेश होता. या दिवशी नर्सरी, एलकेजी, युकेजी विद्यार्थी पारंपारिक वारकरी वेशभूषा करून आले होते. प्रथमतः विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची व पालखीची पूजा करण्यात आली. यावेळी शाळेच्या सल्लागार डॉक्टर अमिता जैन, मुख्याध्यापिका सौ शिवांजली अकोलकर, विद्यार्थ्यांचे आजी आजोबा हजर होते. पूजेनंतर शाळा परिसरामध्ये बालगोपाळांची दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित आजी आजोबा तर्फे स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसाद म्हणून सर्व मुलांना चिक्कीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

June 28, 2023