Loading Events
  • This event has passed.

Dindi Celebration 2025 26

July 4

ज्ञानसंपदा शाळेत दिंडी उत्सवास आजी आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग.

आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्ञानसंपदा शाळेत आपल्या परंपरा जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संस्कारचे बीज रुजवण्यासाठी आजी-आजोबांची वारी या अनुषंगाने दिंडी उत्सव व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी शाळा परिसरातील मूकबधिर विद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला. विठू माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषाने शाळा परिसर दुमदुमून गेला. यामध्ये आजी आजोबा,पालकांनी अभंग गायन करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. या पार्श्वभूमीवर दिनांक २३ ते २७ जून या दरम्यान इयत्ता नर्सरी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी श्लोक अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मुलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेत मुली नऊवारी साडी,मुले कुर्ता पायजमा व हातात भगवी पताका, टाळ मृदुंग घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यादरम्यान इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोलाज उपक्रम घेण्यात आला यामध्ये पायी दिंडी सोहळा, वारकरी संप्रदायातील संत परंपरा, वारीतील गोल रिंगण, श्री विठ्ठल मंदिर व चंद्रभागा नदी परिसर, या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कोलाज तयार केले.

या दिंडी उत्सवास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

July 4