- This event has passed.
ज्ञानसंपदा शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
ज्ञानसंपदा शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी,ज्ञानसंपदा शाळेत माजी विद्यार्थी संघाचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला.माजी विदयार्थ्यांनी शाळेचा स्नेहभाव वृद्धिंगत होण्यासाठी सतत शाळेशी संपर्कात राहुन शाळेसाठी, सध्या शिक्षण घेत असणाऱ्या विध्यार्थ्यासाठी आपले योगदान द्यावे. शाळेच्या
नवनवीन उपक्रमात आपल्या उच्च शिक्षणाचा, व्यवसायाचा, नोकरीचा अनुभव सांगून मुलांना मार्गदर्शन करावे. वेगवेगळ्या प्रकारचे करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करावे, या मुख्य उद्धेशाने व प्रेरणेने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सन 2013-14 ते 2024-24 या शैक्षणिक वर्षातील असंख्य विदयार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, शाळेने आपल्याला दिलेले संस्काराचे धडे आपल्या पुढील शिक्षणात तसेच दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त ठरले याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या . या माजी विद्यार्थी संघाची एक कोअर कमिटी तयार करण्यात आली जेणेकरून वर्षभर विविध उपक्रम राबविता येतील तसेच शाळेशी आपली नाळ सदैव जोडून राहील . संस्थेचे खजिनदार अविनाश बोपर्डीकर, मुख्याध्यपिका शिवांजली अकोलकर, सहशिक्षक श्री. कैलास जाधव व विद्यार्थी प्रतिनिधी महेश
नेमाने,शुभम मडके, ऋषी घुले, रोहित भोजने अंजनी जोशी तनवी बोकील यांचा समावेश केला गेला.
याप्रसंगी संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रवीण बजाज उपाध्यक्ष श्री. मिलिंदजी गंधे,मानद सचिव अरुण कुलकर्णी यांनी माजी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल तसेच शाळेशी ठेवलेल्या ऋणानुबंधाबद्दल व सहकार्याबद्दल कौतुक करत अभिनंदन करत,माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एक आदर्श नागरिक व संस्कारी विद्यार्थी घडवणे या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना कशी केली, याबद्दल संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी याबद्दल आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.
आपल्या मनोगतात अनेक विध्यार्थ्यानी शाळेच्या दिवसातील आठवणीना उजाळा देत, यापुढे शाळेतील विध्यार्थ्यांना अनुभव विशद करण्याचे व मार्गदर्शन करण्याचे तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात दोन मुख्य उपक्रम शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी राबविण्याचे आश्वासन दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर व सहशिक्षक श्री कैलास जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शाळेकडून खास भेटवस्तू ही देण्यात आल्या. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन अंजनी जोशी तनवी बोकील, मनाली कुलकर्णी यांनी केले.

