- This event has passed.
ज्ञानसंपदा शाळेत दिंडी उत्सव उत्साहात संपन्न
भारतीय संस्कृतीची जोपासना होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची रुजवणूक व्हावी विद्यार्थ्यांना आपल्या रीतीरीवाजांचे पालन करता यावे व त्यांच्यामध्ये सद्गुण वृद्धिंगत व्हावे, वारकरी संप्रदायातील संतांची शिकवण त्यांना आचरणात आणता यावी या उद्देशाने तपोवन रोड सावेडी येथील ज्ञानसंपदा शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. या दिंडी उत्सवामध्ये एलकेजी ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. हातामध्ये भगवी पताका कपाळी केशरी गंध डोक्यावर तुळस असा वारकऱ्यांच्या वेशभूषेत बाळ गोपाळांचा संत मेळा विठू नामाचा गजर करत होते. सुरुवातीला शाळेच्या प्रांगणात आरती करून विद्यार्थ्यांनी व आजी-आजोबांनी अतिशय भक्ती भावाने अभंगाचे सादरीकरण केले.त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व आजी आजोबा यांनी
पालखीची मिरवणूक काढली.
शाळेचा संपूर्ण परिसर हा राम कृष्ण हरी तसेच ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमून गेला.
याप्रसंगी श्लोक अभंग स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या दिंडी उत्सवात विद्यार्थ्यांबरोबर आजी-आजोबांचा उस्फूर्त असा प्रतिसाद लाभला. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिवांजली अकोलकर. सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते. शाळेच्या विश्वस्तांनी श्लोक अभंग सादर करणाऱ्या तसेच दिंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, यांचे अभिनंदन केले.