- This event has passed.
Cleanliness Drive
ज्ञानसंपदा शाळेतील विद्यार्थ्यांनी राबविला स्वच्छता उपक्रम
दिनांक 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त सावेडी परिसरातील ज्ञानसंपदा शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी यांचे स्वच्छते विषयीचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व, आपले कर्तव्य यांची जाणीव व्हावी या उद्देशाने स्वच्छता उपक्रम राबवला. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांनी पाईपलाईन रोड येथील तुळजाभवानी माता मंदिर परिसर तसेच शाळा परिसर इत्यादी ठिकाणी जाऊन हॅन्ड ग्लोज, मास्क वापरून हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छतेचे फलक तयार करण्यात आले होते.
येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून विद्यार्थी त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते
या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या साधनांची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
महानगरपालिकेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतात स्वच्छतेचे महत्त्व सांगून या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे विश्वस्त, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर, तसेच सावेडी परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
