सावेडी उपनगरातील उपक्रमशील शाळा म्हणून ज्ञानसंपदा शाळेची ओळख आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना त्यांना संस्काराची जोड द्यावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (कविवर्य कुसुमाग्रज जयंती) शाळेत विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी माय मराठी व संस्कार या विषयाला अनुसरून कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. […]