Marathi Day Celebration 2023
मराठी राजभाषा दिन
सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर शाळेत कविवर्य कुसुमाग्रज जयंती निमित्त मराठी राजभाषा तथा मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. आपली शाळा जरी इंग्रजी माध्यमाची असली, तरीसुद्धा शाळेत मराठी संस्कृती ,परंपरा, सण समारंभ ,मूल्य ,यांची नियमित जोपासना केली जाते .या अनुषंगाने यावर्षी मराठी सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपण विविध स्पर्धेचे आयोजन केले होते .त्यात कथाकथन ,निबंध स्पर्धा, गटचर्चा ,यांचा समावेश होता.
सोमवार दिनांक 27 रोजी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापूजनानेे करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते व सूत्रसंचालक प्राध्यापक प्रसाद बेडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती. प्रमुख अतिथी प्राध्यापक प्रसाद बेडेकर संस्थेच्या शैक्षणिक सल्लागार अमिता जैन, मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा व मी मराठी या गीतांच्या गायनाने मातृभाषेबद्दल अधिकच जिव्हाळा वृद्धिंगत झाला. लोककलेचा अविष्कार म्हणजे भारुड वासुदेव याचे उत्तमरित्या मनोरंजक पद्धतीने सादरीकरण इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी होते. शिक्षक भाषणात श्री कैलास जाधव यांनी माय मराठीचे महात्म्य ,थोरवी आणि मातृभाषेचे श्रेष्ठत्व व्यक्त होते.
प्रमुख पाहुणे श्री प्रसाद बेडेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपली भाषा आपणच समृद्ध केली पाहिजे. जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे .आपल्या माय मराठीचा गोडवा इतरांना आपण बहाल केला पाहिजे .याप्रसंगी आठवडाभर घेतलेल्या विविध स्पर्धेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विचार भारती वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम आलेल्या मनाली कुलकर्णी हिचे सुद्धा पाहुण्यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री जाधव यांनी केले तर परिचय व आभार शिल्पा कुलकर्णी यांनी होते. सूत्रसंचालन समृद्धी खेसे , सिद्धी जाधव व शताशी नाईक यांनी होते. माऊली ज्ञानेश्वर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.