विचार भारती आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धा

ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मीडियम सावेडी अहमदनगर शाळेने विचार भारती आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये मोठे यश संपादन केले आहे. विचार भारतीविचार भारती ने यावर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर एक जीवन प्रवाह या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा प्रमुख दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली पहिल्या फेरीत सर्व शाळेतील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून
घेण्यात आले होते.
दुसरी फेरी रेणावीकर माध्यमिक विद्यालय येथे घेण्यात आली .यामध्ये एकूण 18 शाळांचा सहभाग होता, त्यात आपल्या शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी मनाली राहुल कुलकर्णी हिने आपल्या विचारात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशप्रेम ,त्यांचा संघर्ष त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान, त्यांनी भोगलेले दुःख, यातना त्यांनी बहाल केलेला उपदेश तसेच त्यांचा संपूर्ण जीवनपट यांचे वास्तव चित्र डोळ्यासमोर उभे केले व श्रोत्यांना अतिशय मंत्रमुग्ध करून टाकले .व या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या उपलब्धीसाठी या विद्यार्थिनीला पारितोषिक तसेच शाळेला प्रथम क्रमांकासाठी फिरता करंडक विचार भारतीचे अध्यक्ष व संस्थेचे मानत सचिव श्री अरुणजी कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी विचार भारतीचे श्री अभय अगरकर व इतर मान्यवर उपसथित होते.यासाठी नगर शहरातून तसेच पालक वर्गातून मनाली कुलकर्णी व ज्ञानसंपदा शाळेचे भरभरून कौतुक केले जात आहे.

      

Add a Comment

Your email address will not be published.